मुख्याधापक संदेश

Principal Image

गांधी विद्यालय शिक्षण संस्था कोंढा अंतर्गत विरली खंदार येथे सन १९५९ ला गांधी विद्यालयाची स्थापना झाली. स्वातंत्र्यानंतरच्या काळात ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार व्हावा, या उदात्त हेतूने प्रेरित होऊन ह्या विद्यालयाची स्थापना करण्यात आली. त्या काळात कोणत्याही भौतिक व शैक्षणिक सुविधा पुरेशा नसतांना समाजातील दानशूर व निःस्वार्थ शिक्षणप्रेमी लोकांच्या मदतीने संस्थाध्यक्ष कै. तुकारामजी मोटघरे यांच्या नेतृत्वात शाळा उभी राहिली. ह्या विद्यालयात इ. ५ ते १० पर्यंतचे शालेय शिक्षण मिळत असल्यामुळे ग्रामीण मुलांना व मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे.

संस्थेचे नवीन विश्वस्त मंडळ सन २००० ला कार्यरत झाल्या नंतर संस्थाध्यक्ष मा. अँड. आनंद जिभकाटे यांच्या नेतृत्वामुळे विद्यालयाचा भौतिक व शैक्षणिक कायापालट झाला. सर्व शैक्षणिक सुविधायुक्त शाळेची नवीन देखणी इमारत मनमोहक बगीचा, सी. सी. टी. व्ही. कॅमेरे, बायोमेट्रिक मशीन, खेळाचे मैदान , खेळाचे साहित्य, प्रोजेक्टर द्वारे अध्यापन, सेमी इंग्रजी माध्यमाची सोय, विविध शैक्षणिक उपक्रम, कला व क्रीडा शिबीर, नियमित पालक भेटी, शालेय व शाळा बाह्य परीक्षा, विविध स्पर्धा परीक्षा, चित्रकला, नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षाची तैयारी तसेच संस्थे द्वारे नियमित शालेय तपासणी इत्यादी बाबीमुळे शाळेची दिवंसेदिवस प्रगती होत आहे.

सध्या विद्यालयात विरली खंदार पिंपळगाव (निपाणी) खाम्बाडी, सोमनाळाs, कातुर्ली, उमरी, बोरगाव इ. गावातील एकूण २६८ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. संस्थेने पुरविलेल्या सर्व सुविधा, शैक्षणिक नियोजन व सामाजिक सहभाग या मुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती होत आहे.

आमचे ध्येय

  • ग्रामीण विद्यार्थ्यांचा संपूर्ण व्यक्तिमत्व विकास घडविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणे.
  • विद्यार्थाला आपल्या जीवनाचे ध्येय गाठण्यासाठी सतत प्रेरणा देणे.

आमचं दृष्टीकोन

  • ग्रामीण विद्यार्थाना शिक्षणाची आवड निर्माण करून त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणणे.
  • विद्यार्थाना शैक्षणिक स्पर्धेत टिकविण्याकरिता विविध शैक्षणिक अनुभव देणे.
मुख्याधापक
-श्री. जे.बी. बोरकुटे
s